5 Common Misconceptions about MPSC Exams

 २०१५ हे वर्ष आमच्यासाठी फार महत्वाचे होते. MPSC च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी “महा-तयारी“, हे एक हक्काचे व्यासपीठ बनवायचे असे जे स्वप्न आम्ही पहिले होते, मागीलवर्षी त्या दिशेने app launch करून पहिले पाऊल टाकले. “महा-तयारी” app कसे असावे?, त्यात कोणती वैशिष्ट्ये असावी? हे ठरवण्यासाठी आम्ही MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो उमेदवारांशी बोललो. या अश्या संभाषणामधून उमेदवारांच्या मनात MPSC परीक्षांबाबत अनेक गैरसमजुती (Misconceptions about MPSC Exams) आहेत असे आमच्या निर्दशनास आले. या अश्याच काही गैरसमजुतीबद्दल आपण या लेखात जाणून घेवू.

Related :  List of Posts in MPSC State Services Examination

१. MPSC च्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी खूप हुशार असावे लागते.

MPSC परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी फार हुशार असावे लागते, अशी एक फार चुकीची समजूत (Misconceptions about MPSC Exams) परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांनी करून घेतली आहे. या एका गैरसमजुतीमुळे अनेकजण तर या वाटेला न गेलेलेच बरे, ते काही आपल्याला झेपत नाही असा समज करून घेतात.

मुळातच MPSC च्या परीक्षांचा योग्य तंत्राने व नियोजनपूर्ण अभ्यास केल्यास त्या उत्तीर्ण होणे फारसे कठीण राहत नाहीत. हुशार मुलांना फक्त हा असा योग्य तंत्राने व नियोजनपूर्ण अभ्यास करण्याचे कसब अवगत असते, म्हणून यशस्वी उमेदवारांमध्ये आपल्याला जास्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधरांचा भरणा दिसतो.

वास्तविक पाहता सामान्य बुद्धीमत्तेचे उमेदवारही सातत्यपूर्ण अभ्यासाने अश्या परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात.

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

२. दिवसात १२-१४ तास अभ्यास केल्याशिवाय MPSC च्या परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य नाही.

MPSC च्या परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पहिले की यांनी दररोज १२-१४ तास अभ्यास केला असेल अशी सर्वसामान्य समजूत असते. १२-१४ तास अभ्यास केल्याशिवाय उत्तीर्ण होणे शक्य नाही, अशी चुकीची समजूतच अनेक उमेदवारांमध्ये आढळून येते.

खरे पाहता किती वेळ अभ्यास करावा हा ज्याच्या त्याच्या ग्रह्याशक्ती, एकाच जागेवर किती वेळ एकाग्रतेने अभ्यास करू शकतो अश्या अनेक बाबींवर अवलंबून असतो. काहींचा जो अभ्यास १०-१२ तासात होतो तोच अभ्यास काहींचा ४-५ तासांतही होवू शकतो. त्यामुळे अभ्यास किती तास करता त्यापेक्षा तो किती चांगला समजला यावर अधिक लक्ष द्या.

Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam

३. ठोकळा पूर्ण पाठ करावा म्हणजे हमखास यश मिळतेच.

MPSC च्या परीक्षांबाबत जश्या काही गैरसमजुती या भीती आणि अज्ञानाशी निगडीत आहेत तश्या काही फाजील आत्माविश्वासामुळे देखील आहेत. MPSC उमेदवारांपैकी एक वर्ग असाही आहे, जो अति-आत्मविश्वासापोटी MPSC परीक्षांना फारच सोपा मानतो. अश्या उमेदवारांच्या मते एखादा ठोकळा पूर्ण पाठ केला म्हणजे हमखास यश मिळतेच.

आयोगातर्फे परीक्षांच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल केले जात आहेत. मागील काही वर्षातील परीक्षांतील प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला असता घोकंपट्टीपेक्षा उमेदवाराला विषय किती चांगला समजला हे कळावे याकडे जास्त लक्ष दिले जात आहे.

त्यामुळे असा ठोकळा पाठांतर करून त्यावरच अवलंबून राहणे उमेदवारांसाठी घातक ठरू शकेल.

Related : Tips to Crack MPSC without Coaching Classes

४. MPSC परीक्षांसाठी खाजगी क्लासेस लावावेच लागतात त्याशिवाय उत्तीर्ण होणे म्हणजे महाकठीण.

वर्तमानपत्रात MPSC च्या खाजगी क्लासेस पान-पान भरून जाहिराती, यशस्वी उमेदवारंचे हसरे चेहरे पाहून MPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी खाजगी क्लासेसशिवाय पर्याय नाही असा चुकीचा समज अनेकांनी करून घेतला आहे.

ही समजूत साफ चुकीची आहे. क्लासेसमध्ये अभ्यास करताना उमेदवारांना वेळेचे नियोजन आणि त्याचे कठोर पालन करावे लागते. कोणत्याही धाकाशिवाय नियमितपणे अभ्यास करणे हे मोठे आव्हान असते, पण स्वतःवर कठोर होऊन कोणतेही कारणे न देता नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास खाजगी क्लासेसची गरज भासत नाही.

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

५. मुंबई, पुण्यात गेल्याशिवाय MPSC चा अभ्यास होत नाही.

UPSC चा अभ्यास करताना जसे दिल्लीला जावे असा एक सल्ला दिला जातो त्याच प्रमाणे MPSC चा अभ्यास करताना पुणे, मुंबईला जावे असे म्हंटले जाते. या ठिकाणी पोषक वातावरण असल्याने चांगला अभ्यास होतो हे खरे असले तरी पुणे, मुंबईला गेल्याशिवाय MPSC चा अभ्यास होत नाही, ही मात्र एक गैरसमजूत आहे.

महाराष्ट्राच्या खेडो-पाड्यातील अनेक उमेदवार आज त्याच्या मुळ गावातूनच परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी होत आहेत. त्यामुळे पुणे,मुंबईला जाण्याची परिस्थिती नाही हे कारण तुमच्या मनात येवू देऊ नका. एकदा अभ्यासासाठीचे संदर्भ साहित्य जमा केल्यावर तुम्ही तुमच्या मुळ गावातच कोणत्याही अडचणीशिवाय अभ्यास करू शकाल. याशिवाय आज इंटरनेटमुळे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून माहिती मिळवू शकता.

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Maha-Tayari App Link

Follow me

Bhaskar Narkar

Co-Founder at Crefix Technology
Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.
Follow me

Bhaskar Narkar

Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.

Leave a Reply