5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

MPSC परीक्षेचा नियोजनपूर्वक अभ्यास करणाऱ्या उमदेवारांसाठी पूर्वपरीक्षा एक औपचारिकता असते पण अनेकदा साध्या चुकींमुळे या परीक्षेत चांगली तयारी झालेल्या उमेदवारांना देखील अपयश येते. या लेखात आपण अश्याच साध्या चुकीबद्दल जाणून घेवूया.

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

1. वेळेचा ताण

पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असली तरी वेळेच्या ताणामुळे उमेदवारांकडून शुल्लक चुका घडतात. परीक्षा हॉलमधील वातावरण या ताणात भरच टाकते. यामुळे प्रश्न पूर्ण वाचले जात नाही, घाई घाईत चुकीचे उत्तर निवडले जाते किंवा ‘ओएमआर शीट’वर चुकीचे गोळे रंगवले जातात.

Related : What You Should Do While Awaiting MPSC Exam

2. फाजील आत्मविश्वास

अनेकवेळा आत्मविश्वासाच्या भरात प्रश्न व्यवस्तित न वाचताच उत्तर निवडले जाते आणि हातातील गुण गमवावे लागतात. असा फाजील आत्मविश्वास उमेदवारांनी टाळलेलाच बारा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचावा. प्रश्न सोपा, माहीत असणारा असला, तरीही!

Related :  MPSC Reference Books List in Marathi

3. परीक्षागृहातील वेळेच्या नियोजनातील अपयश

वस्तूनिष्ठ प्रकारच्या परीक्षातील यश हे अभ्यासाची तयारी आणि वेळेचे नियोजन यावर अवलंबून असते. कितीही चांगला अभ्यास झाला असेल तरी वेळेची सांगड न साधता आल्यास सर्व व्यर्थ ठरते. अनेक उमदेवार प्रश्नपत्रिका पूर्ण वाचण्यात वेळ घालवतात त्याऐवजी प्रश सोडवण्यास सुरुवात करणे, हे अधिक योग्य ठरते. जे प्रश्न अवघड वाटत असतील त्यावर वेळ घालवण्यापेक्षा आधी सर्व सोप्पे आणि कमी वेळ घेणारे प्रश्न सोडवावे आणि त्यानंतर वेळ काढू प्रश्नांना हात लावावा.

Related : MPSC List of Exams

4. सरावाचा अभाव

अभ्यास कितीही चांगला झाला असला तरी परीक्षेच्या त्या ठरविक वेळात तो मांडता न आल्यास त्याचा काही फायदा नसतो. बरेच उमदेवार सराव चाचण्या न सोडवताच परीक्षा देतात, आणि वेळेच्या गणितात सपशेल मार खातात.

Related : List of Posts in MPSC State Services Examination

5. माहित नसतानाही उत्तरे देणे

काही उमदेवार उत्तरे माहित नसताही उत्तरे ठोकत सुटतात आणि अखेरीस नकारात्मक गुणांची शिक्षा स्वतःवर ओढून घेतात. अजिबात माहित नसलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊ नका.

Related : Tips and Tricks to Solve MPSC Prelims

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Maha-Tayari App Link

3 thoughts on “5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

Leave a Reply