Tips and Tricks to Solve MPSC Prelims

MPSC पूर्वपरीक्षेतील यश हे तुमची तयारी आणि परीक्षागृहातील वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. बहुसंख्य उमेदवार अभ्यास चांगला झाला असला तरी परीक्षागृहातील वेळेच्या व्यवस्थापनात मार खातात. या लेखात MPSC पूर्वपरीक्षा अधिक जलद आणि परिणामकारक कशी सोडवता येईल हे जाणून घेवू.

स्वतःची बलस्थाने ओळखा

८०-२० च्या नियमाप्रमाणे आपल्या २०% प्रयत्नामुळे आपल्याला ८०% परिणाम मिळतात. त्यामुळे आपल्या बलस्थानावर अधिक लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जे विषय चांगले समजतात, ज्या विषयांमध्ये तुम्ही जलद आणि योग्य उत्तरे देता, परीक्षेत त्या विषायांपासून सुरुवात करा. याद्वारे परीक्षेच्या सुरुवातीस तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेचा ताण ही कमी होईल.

Related :  5 Most Common Mistakes Candidates Make during MPSC Preliminary Exams!

कमी वेळ घेणारे विषय आधी सोडवा

गणित तुमचा बलस्थान असला तरी कमी वेळ घेणारे इतर विषय आधी सोडवा. याद्वारे तुम्ही कमी वेळा मध्ये अधिक प्रश्न सोडवू शकाल.

Related :  MPSC Reference Books List in Marathi

वेळ वाया घालवू नका

एखादा प्रश्न अडत असेल किंवा जास्त वेळ घेईल असा वाटत असेल तर त्यावर वेळ वाया घालवू नका. एका योग्य उत्तरासाठी २-३ प्रश्नांचा वेळ घालवणे कधीही योग्य नाही.

Related : MPSC List of Exams

तर्क करा

वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या परीक्षांमध्ये तर्काला खूप महत्त्व असते. चार पर्यायांपैकी कोणते अयोग्य पर्याय आहेत, हे ओळखता येणे सुद्धा योग्य उत्तराच्याजवळ जाण्याचा मार्ग ठरतो.

Related : 10 Effective Tips To Get Higher Marks in MPSC

नकारात्मक गुण पद्धतीचा फायदा करून घ्या

नकारात्मक गुण पद्धतीचे अनेकांना दडपण येते पण या गुण पद्धतीचा वापर अधिक गुण मिळवण्यासाठी ही होवू शकतो. ४ चुकीच्या प्रश्नासाठी १ योग्य प्रश्नाचे गुण वजा होत असल्याने तर्काचा वापर करून अधिक प्रश्न सोडवल्यास त्यातील एखादा जरी योग्य आला तरी तुमचे चुकीच्या प्रश्नाने वजा होणाऱ्या गुणाची भरपाई होवू शकेल.

Related : List of Posts in MPSC State Services Examination

महाराष्ट्रातील शासकीय नोकरींच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले नाव आणि आपला Mobile No. व E -mail ID खालील Form मध्ये भरून Submit करा.  

——-x–x–x——

Maha-Tayari App Link

Follow me

Bhaskar Narkar

Co-Founder at Crefix Technology
Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.
Follow me

Bhaskar Narkar

Bhaskar Narkar is a young entrepreneur & founder at Crefix Technology. He blogs about mobile app business, design thinking & internet marketing. He lives in Mumbai, India with his family.